सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन
संविधान तक्ता
संविधान तक्ता (1)
blue print
साधनतंत्रे
*संविधान तक्ता व त्याची आवश्यकता:*
_संविधान तक्ता: प्रश्न पत्रिकेच्या त्रिमिती आराखडा ,उद्दिष्टानुसार महत्वांश,आशयानुसार महत्वांश,प्रश्न प्रकारानुसार महत्वांश ह्या प्रश्न पत्रिकेच्या त्रिमिती आराखड्यास संविधान तक्ता म्हणतात._
*संविधान तक्ता आवश्यकता:*
_१.संविधान तक्ता केल्यामुळे मूल्यमापन उद्दिष्टां नुसार होते._
_२.आशयातील सर्व घटकांना योग्य महत्व दिले जाते._
_३.संविधान तक्तामुळे प्रश्नाची विविधता येते._
_४.पाठ्यांशाच्या सर्व भागाचे अध्ययन करण्यावर विद्यार्थी भर देतात._
*संविधान तक्ता आवश्यकता:*
१.उपघटक : मुद्दे व उप मुद्दे.
२.ज्ञान:निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न.
३.आकलन: निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न.
४.उपयोजन : निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न.
४.कौशल्य: निबंधवजा प्रश्न,लघुत्तरी प्रश्न,वस्तुनिष्ठ प्रश्न.
४.प्रश्नांचे प्रकार :
१.निबंध वजा किंवा दीर्घोत्तरी प्रश्न :
२.लघुत्तरी प्रश्न
३.वस्तुनिष्ठ प्रश्न :
_१.प्रत्यावाहानात्मक प्रश्न (आठवणे):-रिकाम्या जागा भरा व एका वाक्यात उत्तरे द्या._
_२.प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न_ (ओळखणे)
_१.व्दिपर्यायी प्रश्न._
_२.बहु पर्यायीपश्न._
_३.जोड्या लावा._
_४.सूचीनुसार जोड्या लावा._
_५.अर्थाविष्कार करणारे प्रश्न : विद्यार्थांची आकलन क्षमता अजमाण्यासाठी अर्थविष्कार करणारे प्रश्न._
_५.प्रत्यावाहानात्मक प्रश्न व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न फरक:_
_१.प्रत्यावाहानात्मक प्रश्न म्हणजे आठवणे व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न ओळखणे._
२. _प्रत्यावाहानात्मक प्रश्नाची रचना करणे सोपे आहे व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नांची रचना करणे अवघड आहे._
३. _प्रत्यावाहानात्मक प्रश्नातून विद्यार्थानाच्या ज्ञान या उद्दिष्टाचे मूल्यमापन करता येते व प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नामुळे विद्यार्थांच्या विचारला फार कमी चालना मिळते._
४. _१.प्रत्यावाहानात्मक प्रश्नात रिकाम्या जागा भरा व एका वाक्यात उत्तरे द्या असे प्रश्न विचारतात व२.प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्नात व्दिपर्यायी प्रश्न,बहु पर्यायीपश्न ,जोड्या लावा ,सूचीनुसार जोड्या लावा ,अर्थाविष्कार करणारे प्रश्न : विद्यार्थांची आकलन क्षमता अजमाण्यासाठी अर्थविष्कार करणारे प्रश्न असे प्रश्न विचारता येतात._
_६.निबंधवजा प्रश्न व वस्तुनिष्ठ प्रश्न यातील फरक :_
१. _निबंधवजा प्रश्नात आपले विचार व्यक्त करण्याचा वाव असतो व वस्तुनिष्ठ प्रश्नात आपले विचार व्यक्त करण्याला वाव नसतो._
२. _निबंधवजा प्रश्नात पुस्तकाच्या मोठ्या भागावर प्रश्न काढत येतात व वस्तुनिष्ठ प्रश्नात पुस्तकाच्या मोठ्या भागावर प्रश्न काढता येत नाहीत._
३. _निबंधवजा प्रश्नाची रचना करणे सोपे असते व वस्तुनिष्ठ प्रश्नात प्रश्नाची रचना करणे फार अवघड असते._
_४. निबंधवजा प्रश्नाची प्रश्न पत्रिका छपाईच्या दृष्टीने सोपी व कमी खर्चाची असते व वस्तुनिष्ठ प्रश्न पत्रिका छपाईच्या दृष्टीने अधिक अवघड व अधिक खर्चाची आहे._
_५.निबंध वजा प्रश्नाची सुधारित आवृत्ती म्हणून लघुत्तरी प्रश्न होय व वस्तुनिष्ठ प्रश्नाचे दोन प्रकार असतात एक प्रत्यावाहानात्मक प्रश्न व दुसरा प्रत्याभिज्ञानात्मक प्रश्न ._
No comments:
Post a Comment