Pages

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन

मराठवाडा मुक्ती संग्राम -
           "संत महंताची भूमी
             माही मराठवाड्याची
             भोळी भाबडी माणसं
             लई पुण्यवान माती."
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहादूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनन्वित अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, दिंगबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्ग काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.
मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार , विनायकराव चारठाणकर, विश्र्वनाथराव कातनेश्र्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला .
या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत , गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड, विश्र्वनाथ भिसे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल काढणं शक्य नाही.
निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, विजयवाड्याकडील बोनाकल ताब्यात घेतले. चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद तर बुलढाण्याकडेच्या तुकडीने जालना शहर ताब्यात घेतले. दुसरीकडे वरंगल, बीदर विमानतळावर भारतीय फौजांनी हल्ले केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.
हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
-----------------------------------------------------------------------------------
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या १७ सप्टेंबर रोजी तब्बल ६० वर्षे पूर्ण होत आहेत. ६० वर्षांपूर्वी १७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता. या संग्रामाच्या उज्ज्वल आणि लोकविलक्षण पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्ततेनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम हे हिंदुस्थानी स्वातंत्र्यलढ्यातील एक उज्ज्वल आणि लोकविलक्षण असे पर्व होते. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना स्वातंत्र्यलढ्याच्या कोणत्याही पर्वाशी केली जाऊ शकते, इतका तो गौरवास्पद आहे. असे असूनही या लढ्याकडे उर्वरित जनतेचे फारसे लक्ष जाऊ शकले नाही. कारण हा लढा चालू असताना उर्वरित देश नव्याने जन्मू घातलेल्या स्वातंत्र्याच्या प्रसूती वेदनात पार बुडून गेला होता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी देश स्वतंत्र झाला तरी हैदराबाद संस्थानच्या रहिवाशांसाठी किंबहुना मराठवाड्याच्या जनतेसाठी स्वातंत्र्याचा खरा जन्म १७ सप्टेंबर १९४८ रोजी झाला. स्वातंत्र्याच्या जवळपास ११ महिने या संस्थानामधील लोक गुलामगिरीतच होते. त्यांच्यासाठी स्वातंत्र्याची पहाट तब्बल ११ महिन्यांनंतर उजाडली. निजामाचा धूर्त डाव होता की, १५ ऑगस्ट १९४७पर्यंत हैदराबाद संस्थान हिंदुस्थानात सामील न करता ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून घोषित करायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जरी हिंदुस्थान व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे स्वतंत्र झाली तरी त्या दिवशी कुठेच सामील न झालेले एकमेव संस्थान हे ‘हैदराबाद’ होते. निजामाने २७ ऑगस्ट १९४७ रोजी आपले ‘स्वातंत्र्य’ घोषित केले. तेथील ‘रजाकार’ या दहशतवादी संघटनेने हिंदी जनतेवर अत्याचार सुरू केले. मोठ्या प्रमाणामध्ये दडपशाही सुरू झाली. हैदराबाद सरकारने हिंदुस्थान सरकारबरोबर ‘जैसे थे’ करार केला होता. त्याचा भंग होऊ लागला. त्यामुळे हिंदुस्थान सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी आपल्या फौजा निजामाच्या राज्यात घुसविल्या. घाबरलेला निजाम शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी संध्याकाळी ५ वाजता हिंदुस्थानी सैन्याला शरण आला. निजामाच्या डोक्यातील स्वतंत्र राष्ट्राचे मनसुबे भंग पावले. या लष्करी कारवाईला ‘पोलीस ऍक्शन’ असे म्हणतात. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याद्वारे केली गेलेली ही कारवाई देशाच्या इतिहासात अजरामर ठरली. निजामशाहीचा अंत झाला. तेथील जनता अत्याचाराच्या कचाट्यातून मुक्त झाली. तत्कालीन हैदराबाद संस्थानामध्ये वर्षानुवर्षे मराठवाड्यात राहणारा तेलंगण प्रांत आता आंध्र प्रदेशपासून वेगळे होण्याची भाषा करीत आहे. मराठवाडा, विदर्भ किंवा तेलंगणसारखे स्वतंत्र राज्य कधीच मागणार नाही. मात्र आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? ( डॉ. राजीव भोसेकर)
१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन महाराष्ट्र राज्याचा भाग झाला....६८व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्या.........!
----------------------------------------------------------
🌹हैदराबाद मुक्तिसंग्राम का घडला?🌹
आजचा मराठवाडा, आंध्र प्रदेशातील तेलंगणा प्रांतातील हैदराबाद, वरंगल, नलगोंडा, निजामाबाद, करीमनगर, मेदक, आदिलाबाद आणि उत्तर कर्नाटकातील बिदर, गुलबर्गा, रायचूर आदी 14 जिल्ह्यांचे मिळून हैदराबाद संस्थान झाले. पोलिस अॅक्शनपूर्वी शेवटच्या निझामाचे युनोत जाण्याचे मनसुबे सरदार पटेल यांनी उधळून लावले. हैदराबादने इंग्रजाचे मांडलिकत्व पत्करले होते. निजामाने त्यांची तैनाती फौजेची पद्धत स्वीकारली होती. त्यामुळे निजामाच्या विशाल राज्याचे संरक्षण हे ब्रिटिशांचे कर्तव्य होते. म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्या सैन्याच्या तुकड्या हैदराबादेत व काही तुकड्या औरंगाबादच्या छावणीत ठेवल्या होत्या. सहावे निझाम मीर महबूब अली हे फार गुणग्राहक, सर्वांना घेऊन चालणारे होते.
त्यांच्या काळात अनेक हिंदू दिवाण होऊन गेले. मात्र, सातवे निझाम मीर उस्मान अली हा पदावर आला मात्र तो कपटी, संधिसाधू, महत्त्वाकांक्षी, व विश्वासघातकी म्हणजे उपकाराची फेड अपकाराने करणारा असा होता. त्यामुळे त्याची राजवट हळूहळू मलीन होत गेली. शेवटच्या टप्प्यात 1945 नंतर रझाकारांमुळे हैदराबाद संस्थान व जुलमी राजवटीला घरघर लागली व 1948 च्या पोलिस अॅक्शननंतर निझामी राजवट संपुष्टात आली. यानंतर जे रझाकार कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली खास निझामसाठी हैदराबाद संस्थान हे आपले संस्थान म्हणून लढले, कित्येक मेले, जिवाची बाजी लावली त्यांनाच निझाम मीर उस्मानअलीने नाकारले.
सहावे निझाम मीर महबूब अलीचा मृत्यू होताच 1 सप्टेंबर 1911 रोजी रेसिडेंट सर अलेक्झांडर पिन्हे याने औपचारिकरीत्या मीर उस्मानअलीला गादीवर बसवले. मीर उस्मानअलीच्या काळातच निझामाचे राज्य (आसाफजाही) संपुष्टात आली. राज्यावर येताच उस्मानअलीने आपणास राजपद मिळवून देणाºया तिघांनाही कामावरून दूर केले. निझामाची भावनिकदृष्ट्या कोणाशीही जवळीक नव्हती. विलक्षण कोरड्या स्वभावाच्या, एकलकोंड्या अशा या मीर उस्मानअलीच्या (1911 ते 1948) स्वभावातच हैदराबाद मुक्तिसंग्राम घडण्याची बीजे होती. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून गणला गेलेला निझाम लोभी आणि कंजूष होता. कायदेशीर मार्गाने दर वर्षी पावणेदोन कोटीपेक्षा जास्त मिळकत असतानाही अप्रत्यक्ष सक्ती असलेले नजराणे, राज्याभिषेक व वाढदिवसाच्या प्रसंगी निझाम पैसे घेत असे. राजधानीबाहेर एखाद्या ठिकाणाला भेट दिली तर एक सोन्याचे नाणे निझामाला द्यावे लागे. निझामाच्या अंकित असलेल्या संस्थानिकांकडे तो येणार असला तर दोन लाख रुपये नजर करावे लागत. त्या संस्थानाचे तेवढे वार्षिक उत्पन्नही नसे. हैदराबाद मुक्तिसंग्राम हा फक्त राजकीय लढा नव्हता तर त्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्वातंत्र्याचाही भाग होता. नागरिकांवर नाना प्रकारची बंधने त्याने लादली होती. कसल्याच प्रकारचे नागरी स्वातंत्र्य संस्थानात उरले नव्हते. निझामाने स्वतंत्र हैदराबादची घोषणा करून टाकली. एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्र संघाकडे आपला वकील पाठवण्यापर्यंत त्याची मजल गेली. भारतातील चळवळींचा प्रभाव हैदराबाद संस्थानातील सुशिक्षित वर्गावर पडू लागला होता. या चळवळींची धास्ती निझाम सरकारने घेतली. स्वदेशीच्या चळवळीने जोर पकडल्यावर या पुढाºयांवर निझाम सरकारकडून हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या गेल्या. 1923 मध्ये राघवेंद्रराव शर्मा यांनी कर्नाटकातील एका परिषदेत निझाम सरकारवर कडक टीका केल्याने निझाम सरकारने त्यांची वकिलीची सनद जप्त केली. 1921 मध्ये निझामाने फर्मान काढून सभा, संमेलने, बैठका, प्रवचन आणि मिरवणुकींवर कडक निर्बंध घातले. मंत्रिमंडळाची परवानगी घेतल्याशिवाय सभा घेता येत नव्हती तसेच व्यायामशाळा आखाडे, खासगी शाळा, ग्र्रंथालये सरकारच्या परवानगीशिवाय काढू नयेत अशी सक्ती केली होती. सरकारचे उस्मानिया विद्यापीठ हे मध्ययुगीन संकल्पनांना चिकटून बसणारे होते. आर्थिक पिळवणूक हैदराबाद संस्थानात शेतीखाली असलेल्या एकूण जमिनीचा 1/3 भाग हा सर्फेखास म्हणजे निझामाच्या स्वत:च्या खर्चासाठी असलेल्या जहागिरी पायगा, जहागीरदार, जमीनदार, मक्तेदार, इनामदार यांच्या अमलाखाली होता. निझामाने सर्फेखास जहागिरीची व्यवस्था मुलकी खात्याकडे दिली होती. या सर्फेखासचा जास्तीत जास्त भाग मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यात होता. तेथील प्रशासन फारच अकार्यक्षम होते. पायगा आणि इतर जहागीरदार यांचे स्वत:चे मुलकी, महसूल व न्याय खाते होते. जहागिरीतील जमिनीवर व रयतेवर अनेक जाचक कर होते. शेतसारा दुप्पट तर काही ठिकाणी त्याहूनही जास्त होता. जमीन कामगारांना संरक्षण नव्हते. जहागीरदार, जमीनदार त्यांना कधीही काढून टाकत असत. जहागीरदाराचा हुकूम म्हणजेच कायदा. तो जास्त पैसे दिले तरच जमीन कसण्यास देई. याशिवाय नदी उतार कर, बभूल फली कर असे कर जहगिरीत वसूल केले जात. जहागीरदाराच्या घरी लग्नकार्य असल्यास रयतेला मोठा नजराणा द्यावा लागे. संस्थानात बाहेरून येणाºया मालावर कर लादण्यात येत होता. त्याला करोडगिरी म्हणत असत. अबकारी खाते व इतर सर्व कचेºयांमध्ये मोठ्या प्रमाणात लाचलुचपत आणि वशिलेबाजी होती. मामूल दिल्याशिवाय कोणत्याही कचेरीत फाइल हलत नसे.
हैदराबाद स्टेट काँग्रेसचा लढा जसजसा उग्र होत गेला तसतसे निझामी पोलिसांचे व रझाकाराचे अत्याचार वाढतच गेले. मात्र, निझामी सरकार त्याविरुद्ध काहीही करत नव्हते रझाकारांनी केकरजवळा येथील पन्नालालजी चांडक यांचे घर लुटले दहेगाव येथील नारायणराव खारकर व बलभीमराव खारकर यांच्या घरांवर हल्ला करून त्यांना ठार मारले व त्यांचे घर लुटले. सेलू येथे या हुतात्म्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. रझाकारांनी सेलूतील सिनेमागृहात उत्तमचंद यांचा खून केला. सेलूचा रोहिला अब्दुल रज्जाक याने रझाकारांच्या साह्याने मोंढा लुटला. पैसे उकळले. रामपुरीत रंगनाथराव माली पाटील यांचा भरदिवसा खून केला; पण पोलिसांनी कारवाई केली नाही. उलट गावकºयांजवळची शस्त्रे निझामी पोलिसांनी आधीच काढून घेतली होती. त्यामुळे माली पाटलाची निर्घृण हत्या लोकांना निमूट पाहावी लागली.
भारत सरकारने हैदराबाद संस्थान मुक्त करण्यासाठी सप्टेंबरात पोलिस अॅक्शन करण्याचे निश्चित केले. 40 वर्षांचे सोसलेपण व शेकडो कारणे, निर्वासितांची रीघ यामुळे भारत सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. भारत सरकारने हैदराबाद स्टेट काँग्रेसचे पत्र घेतले. जनतेचा कौल यावरून हा प्रश्न युनोत नेला व इकडे 13 सप्टेंबर रोजी पोलिस अॅक्शन सुरू केली. 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता निझाम मीर उस्मानअली भारत सरकारला शरण आला. सामीलनाम्यावर संस्थान भारतात विलीन झाले. हैदराबादचा प्रश्न निझामाने युनोत नेला होता. त्यास पाकिस्तान व फ्रान्स पाठिंबा देणार होते. तो प्रश्न मोठा होण्याच्या आत सरदार पटेलांच्या आदेशाने जनरल जयंत चौधरीच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने कारवाई केली. हैदराबाद मुक्त नसते झाले तर ते स्वतंत्र राष्टÑ झाले असते व भारताच्या नाभिस्थळात दक्षिण पाकिस्तान निर्माण झाला असता. भारताच्या अंतर्गत संरक्षणासाठी ते कायम वाद व डोकेदुखी होऊन बसले असते. यामुळे हैदराबाद मुक्तिसंग्राम घडला.

=====================================
भाषण:-

मराठवाडा मुक्ति संग्राम दिन


"समोर होता एकच तारा
अन पायतळी अंगार !"



अशा धेयधुंद भावनांनी ज्यांनी हैद्राबाद मुक्ती लढयासाठी जीवाची बाजी लावून तुरुंगवास भोगला हौतात्म्य पत्करले. अशा सर्व ज्ञात - अज्ञात स्वातंत्र्यसेनानी ,वीरांगनाना ही  शब्दरूप आदरांजली.....



'स्वप्ने पडली उष:काळाची
हाती मात्र अंध:कार
देश सारा उजळला जरी
मराठवाड्याची काजळ रात'



दिवस १५ ऑगस्ट १९४७ चा साऱ्या भारतभर स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले. परंतु हैद्राबाद संस्थान मात्र अजूनही भारतात विलीन झाले नवते. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात असलेला मराठवाडा पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्याचे सुख अनुभवणाऱ्या भारताच्या हृदयावर मराठवाड्याच्या पारतंत्र्याची बोचरी जखम होतीच. परकीय सत्तेविरुद्ध एकत्र येताना भारतीयांनी केलेला नेटाचा प्रयत्न  हा कौतुकाचा खराच; पण स्वातंत्र्यानंतरही आणखी एका स्वातंत्र्यासाठी लढा देणं किती क्लेशदायक असेल?. हैद्राबाद हे भारतातील एक मोठे संस्थान होते. स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा अट्टाहास  होता. तेलगु, मराठी, कानड भाषिक लोकांचा मोठा वर्ग या संस्थानात होता. जामाच्या जुलुमी अधिपत्याखाली या प्रांतातील लोकांना कोणतेही राजकीय व नागरी अधिकार नव्हते; म्हणून निजामाविरुद्ध जनमत तयार होऊ लागले. त्यातच  निजामाचे  पाठबळ असलेला कासीम रजवी याने आपल्या 'रझाकार' या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अमानुष अत्याचार सुरु केले.



'रण  पेटले पेटले रण
अग्निज्वाला सर्वदूर
अंगार मनामनात
झुगारु हा अंकुश'



जनमताचा प्रक्षोभ उसळला . खेडी, शहर, निजामाविरुद्ध खदखदू लागली; आणि याला संघटनात्मक व वैचारिक आव्हान दिल, स्वामी रामानंद तीर्थ यांनी.१९३८  मध्ये स्थापन झालेल्या हैद्राबाद स्टेट कोग्रेसकडे याचे नेतृत्व आले. लढा घराघरात पोहोचला आणि प्रत्येक स्तरातून मुक्तिसंग्रामाचे सेनानी उभे राहिले. गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, पुरषोत्तम चपळगावकर, रामलिंग स्वामी, श्रीनिवासराव बोरीकर, किशोरभाऊ शहाणे यांनी हे स्फुलिंग चेतवले. या लढ्यात स्त्रियाही काही मागे नव्हत्या .आशाताई वाघमारे, करुनाबेन चौधरी, सुशीलाबेन दिवान यांची नावे आपल्याला घेता येतील. वेदप्रकाश श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक यासारख्या कित्येक र्थ्यांनी 'वंदे मातरम' चालवली अंतर्गत निजाम सरकारविरुद्ध आपला रोष व्यक्त केला.



'मुक्तीचा आक्रोश आमुचा
स्वातंत्र्य आम्हा पाहिजे
ध्यास एक श्वास एक
हेच आमुचे ध्येय असे'



भारत सरकारमध्ये सामील होण्याची तेथील लोकांची तीव्र इच्छा , त्याचे उठणारे तीव्र पडसाद, लोकांवर होणारा अमानुष अत्याचार या सगळ्याविरुद्ध 13 सप्टेंबर १९४८   रोजी भारत सरकारने हैद्राबाद संस्थाना विरुद्ध कारवाई केली .इ.स.१२९४ मध्ये मराठवाडा इस्लामी राजवटीचा आरंभ झाला. 17 सप्टेंबर १९४८  ला या संस्थानाच्या वीलीनीकरणाने त्या राजवटीचा अंत झाला. समान संस्कृती व समान भाषा बोलणाऱ्या आप्तांना लोकशाही राज्यात म्हणजे महाराष्ट्रात मराठवाडा विलीन झाला त्यासाठी 1 नोव्हेंबर 1956  या दिवसाची वाट पहावी लागली.

No comments:

Post a Comment